तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर्
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे इंतजामिया दरगाह कमिटीच्या वतीने हजरत शहीद सरदार खॉवली उरुसानिमित्त कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस गावातील अनेक तरुण युवकांनी रक्तदान केले त्यावेळेस गावातील प्रमुख मान्यवर उप सरपंच वीजय कवडे, ग्रा. प. सदस्य हारुन अली, माजी सरपंच गजानन नरड, माजी उपसरपंच इस्माईल पठाण, ग्रा. प. सदस्य सचिन पारसडे, नितीन शेलकर, युसुफ कुरेशी त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळेस मोठ्या संख्येने गावातील युवक उपस्थित होते