बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्या वाढदिवसांच्या निमित्त जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप

अन्य सोशल

निर्मल उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी जलालखेडा यांच्या वतीने साहित्याचे वाटप

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपूर

जलालखेडा (त.8) निर्मल उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या आठव्या वर्धापन दिना निमित्त व बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांच्या वाढदिवसा निमित्त निर्मल उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा जलालखेडा यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जलालखेडा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून दुहेरी उत्सव मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच कैलास निकोसे तसेच निर्मल उज्वल बँकेचे व्यवस्थापक चंद्रशेखर डोईजोड, कॅशियर नितेश बारस्कर, शैलेश नानोटकर शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, सहाय्यक शिक्षिका निशा भक्ते व विद्यार्थी उपस्थित होते. फोटो ओळी. विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वितरित करताना सरपंच कैलाश नीकोसे व निर्मल उज्वल बँकेचे अधिकारी व शाळेतील शिक्षक.

CLICK TO SHARE