ठाणेदार आसिफराजा शेखची धडक कारवाई लाखो रुपयेची देशी दारू जप्त

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

ठाणेदार आसिफराजा शेखची धडक कारवाई ! ‌‌लाखो रुपयेची अवैध दारू जप्त अवैध धंदे करणा यात उडाली खळबळ बल्लारपूर नगरातील अवैध दारू बंद होणार का बल्लारपूर: जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार आसिफराजा शेख यांनी काल लाखो रुपयांची अवैध दारू पकडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे उपरोक्त लाखो रुपये किंमतीची अवैध देशी विदेशी दारू एका वाहनातून जात होती.गोपनिय माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह सापळा रचून सदरहू अवैध दारूचे वाहन कन्नमवार वार्ड न्यु कॉलोनी येथे पकडले असल्याचे बोलल्या जाते. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे.सदरहु कारवाई पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख‌ एपीआय प्रविण कडु, पीएसआय साठे, हवलदार रणविजय ठाकुर, विशिष्ट रंगारी, श्रीनिवास वाभीटकर व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी केली कारवाई दिवसेनदिवस शहरात अवैध दारूसह अन्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले असून पोलिस विभाग या कडे जातीने लक्ष पुरवतिल काय ,?

CLICK TO SHARE