तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
अल्लिपुर हे गाव जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू समजल्या जाते, हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन येथे मोठी वर्दळ असते,पण या गावात सध्या तरुणाई एका वेगळ्याच धुंदीत दिसत असुन ही धुंदी दारू ची असल्याचे चित्र दिसत आहे,वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीला कमालीचा ब्रेक लागल्याचे चित्र दिसत असताना अल्लिपुर मधील दारू कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहे.कदाचीत अल्लिपुर पोलीस अधीक्षकांच्या नजरेतून सुटले तर नसावे ना असा प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहे, बैल बाजार चौकात तीन चार मोहा फुलाची दारू विक्रीची दुकाने सूरू आहे,त्यामुळे खास करून तरुण वर्ग या व्यसनात पूर्णतः गुरफटून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे एकीकडे पोलीस अधीक्षक मोठ्या इमानदारीने व मेहनतीने जिल्ह्याला व्यसन मुक्ती कडे घेऊन जात असताना काही अधिकारी आपल्या आर्थिक फायद्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या या कल्पनेला फाटा देण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.तरी पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे