इतिहासात पहिल्यांदाच अल्लीपुरात येणार महिलाराज

अन्य

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक ग्रामपंचायत कार्यालयात आरक्षण सोडत झाली. सरपंच पदासाठी अनुसूचित जाती महिला राखीव आहे. तर ९ महिला सदस्य व आठ पुरुषांची निवड होणार असल्याने इतिहासात पहिल्यांदाच महिला राज अस्तित्वात येणार आहे. एकूण सहा वॉर्ड असून आतिपाती वॉर्ड क्र.१ मध्ये सर्व साधारण महिला २ व सर्व साधारण १, भवानी वॉर्ड २ नामाप्र महिला, सर्वसाधारण महिला, विठ्ठल मंदिर वॉर्ड क्र. ३ मध्ये नामाप्र महिला व सर्व साधारण, सदानंद वॉर्ड नामाप्र, सर्व साधारण महिला, गळोबा वॉर्ड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र महिला. जयभीम वॉर्ड नामाप्र, सर्व साधारण महिला दोन, याप्रमाणे सोडत झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी लवणकर, तलाठी निशानकर व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी सोडत प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकतें उपस्थित होते.

CLICK TO SHARE