भारतीय आदिवासी पॅंथर कर्मचारी संघटनेच्या वतीने भिक मागो आंदोलन

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत :वसमत येथील भारतीय आदिवासी पॅंथर कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी वसमत येथे भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनामध्ये अनेक भारतीय आदिवासी पॅंथर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाची सुरुवात येथून करून तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली. विविध ठिकाणी भीक मागून जमा झालेला चंदा हा तहसील कार्यालयाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आला.या आंदोलनाला आंबेडकर जनमोर्चा चे मराठवाडा अध्यक्षअशोक इंगोले यांनी जाहीर पाठिंबा दिला. या आंदोलनामध्ये एडवोकेट प्रशांत बोडके, गजानन मुकाडे, ढाकरे सर, गजानन काळे, हरिभाऊ पिंपरे, अंबादास चिरमाडे, नादरे पाटील, अशोक कराळे, ज्ञानेश्वर काठमोडे, ज्ञानेश्वर कुरुडे, दत्ता गडदे, गुणाजी चाकोते, गजानन काळे, देविदास बोडके, संतोष पानबुडे, सखाराम अंभोरे,भीमराव चिरमाडे, उद्धव हजारे, यांच्यासह शेकडो भारतीय आदिवासी पॅंथर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE