अवैध्य वाहतूक करणाऱ्या रेतीच्या टिप्परची ऑटोला धडक

क्राइम

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

धोत्रा ते अल्लिपुर मार्गाने 10फरवारीला रात्री रेतीची अवैध्य वाहतूक करणाऱ्या टिप्परणे ऑटो ला धडक दिल्याने प्रवासी विलास हजारे जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे उपचाराकरिता प्रा. आ. केंद्रात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र मार जास्त असल्याने डॉक्टरांनी वर्धा येथील शासकीय रुग्णालयात त्यांना रेफर केले रेतीची वाहतूक अल्लिपुर मार्गाने भर दिवसा व रात्री राजरोसपणे सुरू आहे मात्र याकडे महसूल अधिकाऱ्यांचे व पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे घटनास्थळी ठाणेदार प्रफुल डाहुले, उपनिरीक्षक नीतीन नलवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला पुढील तपास करीत आहे

CLICK TO SHARE