तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
हिंगणघाट:तालुक्यात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट झालीय. मागील अर्धा तासापासून वादळी वाऱ्यासह हिंगणघाट आणि समुद्रपूर अल्लिपुर येथे गारपिट झालीय. यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. निंबूच्या आकाराची गार हिंगणघाट शहरसह इतर भागात रस्त्यावर विखुरलेली आहे. अचानक आलेल्या गारपिटीने शेतकरी हवालदिल झालाय. तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांच कंबरड मोडलं तर आज. तालुक्यात गारपिटीने चांगलाच कहर केला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, तूर, कापूसांचे नुकसान झाले आहे.तरी शासनाने पंचनामे करून शेतकरयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेकऱ्यांनी केली आहे