सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

अन्य

प्रतिनिधी:सुनील हिंगे अल्लीपूर

हिंगणघाट तालुक्यातील काचंनगाव येथे सिमेंट रस्त्याचे कामाचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्ष नाना ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस माजी सरपंच वामन खोडे, सरपंच नंदाताईचिंचोलकर, उपसरपंच सम्राट मुरार व सर्व ग्रामपंचायत सदस्य काचंनगाव येथील सिमेंट रोडच्या कामाचे भूमिपूजनाला उपस्थित होते. गावखेड्याचा विकास हा रस्त्याच्या कामापासूनच सुरू होत असून नागरिकांना शिक्षण, आरोग्य, व उपजिविका महत्वाची असल्याचे यावेळेस सांगण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील नागरिक बांधव उपस्थित होते.

CLICK TO SHARE