शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
शहरातील मुख्य रस्त्यावरील भिंती चित्राद्वारे सुशोभितनगरपरिषद बल्लारपुरतर्फे भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धा-२०२४ अंतर्गत नगरपरिषदेचे माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात शहरातील मुख्य रस्त्यावरील तसेच दर्शनीय भागातील भिंती उत्तम अशा शहरातील तसेच बाहेरून आलेल्या चित्रकलाकारांमुळे बोलक्या व जागृत दिसत आहे. सदर भिंतीचित्र स्पर्धा ही केंद्र शासनाचा उपक्रम “स्वच्छ सर्वेक्षण २०२४ तथा माझी वसुंधरा ४.०” अंतर्गत ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ या चार दिवसांत आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेच्या कालावधीत गोंडराजे बल्लारशाह नाट्यगृह येथे नावनोंदणीची मोफत सुविधा पुरविण्यात आली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता स्पर्धकांची गर्दी दिसून येत आहे. स्पर्धकाना भिंतीचित्र रेखटण्यात कुठलाही त्रास होऊ नये या करिता त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा त्यांच्या जागेवर पोहोचविण्यात येत आहेत उदा. जसे त्यांना लागणाऱ्या पेंटिंग किट , पिण्याकरिता पाण्याची कॅन ,किट टेवण्याकरिता टेबल ,सकाळ चा नास्टा , दुपारचे जेवण , ये – जा करण्याकरिता वाहनाची व्यवस्था इत्यादि नगरपरिषदेतर्फे पुरविण्यात येत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही दुपारपर्यंत एकुण ३८ स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली . स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणी नुसार भिंतीचित्र रेखाटण्याकरिता भिंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्पर्धकांचा भिंती चित्ररेखाटण्याचा उत्साह वाढत असून एक चित्रकार एक पेक्षा जास्त भिंतीचित्र रेखाटण्यात उत्सुक आहे ही सुविधाही नगर परिषद मार्फत पुरविण्यात येत आहे. न. प. मार्फत देण्यात आलेल्या विविध विषयावर चित्रकार भिंतीचित्र रेखाटत आहे. स्पर्धेबाबत अधिक महिती प्राप्त करण्याकरिता तसेच स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नगरपरिषदेच्या संपर्क क्रमांक ७६६६९५२९२९ किंवा ८८०५६७४५६५ वर संपर्क करण्याचे आवाहन मा. मुख्याधिकारी, नगरपरिषद बल्लारपुर यांनी केले आहे.