विद्यार्थ्यांनी घेतल्या जंतनाशक गोळ्या,आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी सर्वत्र राबविण्यात आली मोहिम

हेल्थ

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा( ता.13) महाराष्ट्र राज्यात मंगळवारी (१३ फेब्रुवारीला) १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. या वयोगटातील मुला- मुलींना जंतामुळे पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यांसह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा धोका असतो. त्यामुळे या वयोगटातील मुलांसाठी शिक्षण तसेच महिला व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने सप्टेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत ही गोळी देण्यात येते. मंगळवारी जवळपास २ कोटी ८० लाख मुला-मुलींना १ लाख १० हजार ९४४ अंगणवाडी केंद्रे, १ लाख २७ हजार ८४९ शाळा व महाविद्यालयांमध्ये जंतनाशक गोळी देण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बुधवारी ज्यांना गोळी घेता आली नाही त्या मुलांना २० फेब्रुवारीला गोळ्या दिल्या जातील. अल्बेंडाझोल ही गोळी शासनाच्या वतीने मोफत दिली जाते. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ही मोहीम यशस्वी रित्या राबवण्यात आली जवळपास ९० टक्के मुला मुलींना या गोळ्या देण्यात आल्या असून राहिलेल्या मुला मुलींनी २० तारखेला या गोळ्या दिल्या जाईल. फोटो ओळी. विद्यार्थ्याना जंतनाशक गोळ्या देताना आरोग्य सेवक लीलाधर पारीसे.

CLICK TO SHARE