सावली वूद्ध आश्रमात ज्येष्ठ नागरिकांकरिता प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले

अन्य सोशल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर च्या वतीने आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती भीष्म मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली FCडेबू सावली वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांकारिता कायदेवीषयक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माननीय सुमित जोशी सर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात मा. सुमित जोशी सर यांनी जेष्ठाचे कायदे व त्यांना मिळणारी मदत तसेच लैंगिक अत्याचार विषयक कायदा यावर मार्गदर्शन केले. एड.महेद्र असरेट यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सल्लागार सदस्य धनंजय तावाडे यांनी संचालन करतांना डेबू सावली वृद्धाश्रम आणी कार्यक्रम आयोजनाबद्दल ची माहिती दिली.तर आभारप्रदर्शन वृद्धाश्रमातील वृद्ध सुधाताई मुळे यांनी केले. कार्यक्रमाला वृद्धाश्रमाचा केअर टेकर सुमित्रा बाई आवळे आणी वृद्ध उपस्थित होते.

CLICK TO SHARE