अभाविपचे जनजातीय छात्र संगम चंद्रपूर येथे संपन्न

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : अखिल भारतीयविद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने चंद्रपुर येथे जनजाती छात्र संगम या जनजाती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील जनजातीय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे प्रमुख अतिथी वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय युवा आयाम प्रमुख वैभव सुरंगे, प्रांत मंत्री पायल किणाके, विदर्भ प्रांत जनजाती कार्य प्रमुख उमेश कुडमेथे, संयोजक भूमिका गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना वैभव सुरंगे यांनी जनजातीय क्रांतिकारी योद्धांवर प्रकाश टाकला तसेच ते म्हणाले जनजातीय समाजाने भारताला सांभाळले आहे व देशावर जेव्हा संकट आले तेव्हा निकराची लढाई लढली आहे.संमेलनात शिक्षा आरोग्य संस्कृती आणि नेतृत्व या विषयांवर विविध मार्गदर्शक व त्यांनी भाष्य केले जनजातीय परंपरा व त्या मागचे शास्त्र या विषयावर जास्वंदा धरू यांनी प्रकाश टाकला तर नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन करताना प्रकाश गेडाम यांनी रामायणाचा विशेष उल्लेख केला. उत्तम आरोग्यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे या विषयी या विषयी डॉ. लक्ष्मीनाराण सरबेरे आणि मार्गदर्शन केले तर प्रकल्प अधिकारी शरद चौधरी यांनी आदिवासी समाजाला मिळणारे विभिन्न योजना व त्याची पात्रता या विषयी विस्तृत माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणात जनजातीय विद्यार्थ्यांनी कसा लाभ घ्यावा या विषयी प्रा. काकडे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.शैक्षणिक परिसरात विद्यार्थ्यांच्या गळतीला घेऊन अभाविप संपूर्ण भारतात परिसर चलो अभियान राबवत आहे ह्या संबंधात प्रांत संघटनमंत्री विक्रमजीत कलाने यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शंभर टक्के उपस्थित राहण्याचे आवाहन केले.संमेलनाचे समारोपीय वक्तव्य विदर्भ प्रांत मंत्री पायल किणाके यांनी ठेवले त्यांनी विद्यार्थ्यांना या संमेलनाचे उद्देश समजावून सांगितले. कार्यक्रमात आलेल्या अतिथींचे आभार चंद्रपूर महानगर मंत्री आदित्य गचकेश्वर यानी मानले.

CLICK TO SHARE