इयत्ता 10 वी व 12 ची माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा कॉपीमुक्त

सोशल

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव

(गोदिया) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभाग, नागपूर तर्फे इयत्ता बारावीची प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 19 मार्च 2024 या कालावधीत जिल्ह्यातील एकूण 76 परीक्षा केंद्रावर तर इयत्ता 10 वी ची प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 1 मार्च 2024 ते दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीत 98 परीक्षा केंद्रावर पार पाडण्यात येणार असून. 12 वी करीता 19924 परीक्षार्थी, तर 10 वी करीता 18603 परीक्षार्थी परिक्षा देणार आहेत….. इयत्ता बारावी आणि दहावीची होणारी प्रमाणपत्र परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त, तणावमुक्त, आणि निकोप वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याने सदर संबंधाने आवश्यक उपाय योजना करण्या संदर्भाने परिक्षा मंडळाकडून निर्देश सूचना प्राप्त झाले आहे.. या अनुषंगाने आज दिनांक- 13 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी, गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, यांचे अध्यक्षतेत, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. मुरगानंथम एम., शिक्षणाधिकारी (माध्यमिक/ योजना ), श्री. कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. महेंद्र गजभिये इत्यादी चे उपस्थितीत सर्व समावेशक असलेली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आलेली आहे……. सदर बैठकीत मा. अध्यक्षांनी 10 वी व 12 ची परिक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त, निकोप वातावरणात, पार पाडण्याकरिता मार्गदर्शक सूचना आणि खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत…. *विद्यार्थी आणि पालक यांचे करीता मार्गदर्शक निर्देश सूचना –*1) जिल्ह्यांतील सर्व परीक्षा केंद्रावर चोख आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 2) भयमुक्त , कॉपीमुक्त निकोप वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यांकरिता 15 भरारी पथके नेमण्यात येणार आहेत.3) गैर प्रकार पाहता परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात मा. जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कलम 37 (1) (3) म.पो.का. अन्वये मनाई आदेश राहणार आहे.4) परीक्षा केंद्रावर उपद्रव करणाऱ्यावर कडक पोलीस कारवाई करण्यात येणार असून भा.द. विं कलम 188 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.5) केंद्रावर बाह्य उपद्रव दिसून आल्यास अशा केंद्रावरील परिस्थिती हतळण्याकरीता कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात येणार आहे…6) परीक्षा सुरू असणाऱ्या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स ची दुकाने बंद राहतील याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.7) परीक्षा केंद्रावर कॉपी चा गैरप्रकार टाळण्या करिता नेमण्यात येणाऱ्या भरारी पथकाद्वारे तसेच पोलीस पथकाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे..8) 10 वी, 12 वी च्या परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत… गैरप्रकार करणाऱ्या किंवा गैरप्रकारास मदत करणाऱ्या सर्व संबंधिततास जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत 10 वी व 12 ची परीक्षा ही कॉपीमुक्त, भयमुक्त, निकोप वातावरणात पार पाडण्याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे कडक धोरण अवलंबिले असून गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

CLICK TO SHARE