उन्हाळा पूर्वी बल्लारपुर शहरातील हॅण्ड पंप (बोरवेल) दुरुस्ती करा-आम आदमी पार्टी बल्लारपुर

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

गुरुवार दिनांक 16/02/2024 रोजीआम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनात, शहर सचिव ज्योतिताई बाबरे यांच्या नेतृत्वात बल्लारपुर शहरातील सध्या पाण्याची टंचाई व उन्हाळा सुरू होणार हे लक्षात घेऊन बोरिंग दुरुस्ती करीता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन देण्यात आले, शहरात खुप ठिकाणी हॅण्ड पंप बंद पडलेल्या आहेत, बल्लारपुर नगरपरिषद तर्फे बोरिंग दुरुस्ती करिता लाखो रुपयांचे टेंडर काढले आहे, तरी बोरिंग बंद का? असा प्रश्न मुख्याधिकारिंना करण्यात आला, आता MJP चे दुरुस्तीचे कार्य होत असताना शहरात नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे दुरुस्ती तर दुसरीकडे हॅण्ड पंप बंद असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे, उन्हाळा सुरु होणार आहे, जनतेला आधीच पिन्याच्या पाण्याचा तूटवड़ा आहे आणि येणाऱ्या काही दिवसात तो वाढणार आहे, तरी शहरातील सर्व बोरिंग दुरुस्त व हॅण्ड पंप मध्ये मोटर फिट करून सुरु करण्यात यावी अशी मागणी “APP” बल्लारपूर तर्फे करण्यात आली.यावेळी शहर सचिव ज्योतिताई बाबरे, महिला अध्यक्षा किरणताई खन्ना, रेखाताई भोगे, मनीषाताई अकोले, मेघाताई, राजू जंगमवार आणि इत्यादी उपस्थित होते.

CLICK TO SHARE