भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा,जिल्हातील ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे नांव जाहीर केली आहे .भाजपा जिल्हा चंद्रपूर ग्रामीण महिला मोर्चा , युवा मोर्चा आणि विविध आघाडी प्रमुखांचा यात समावेश आहे.दर तिन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते, त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे, जिल्हा ग्रामीणच्या सरचिटणीस पदावर डॉ मंगेश गुलवाडे,संध्या गुरनुले ,विजभुषण पाझारे, राजु गायकवाड,विवेक बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वंदना शेंडे या भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा असतिल.सरचिटणीस पदावर विजया डोहे,निलम सुरमवार, लक्ष्मी सागर यांच्यी नियुक्ती करण्यात आली.भाजपा युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर ग्रामीणचे महेश देवकते हे अध्यक्ष असतिल. युवा मोर्चा सरचिटणीस पदावर श्रीनिवास जंगमवार, अमित गुंडावार,तनय देशकर,यश बांगडे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हा चंद्रपूर ग्रामीणच्या भाजपाच्या आघाडी प्रमुखांच्या नावांची घोषणा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली आहे.ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ.अंकुश आगलावे यांची निवड करण्यात आली आहे.गौतम निमगडे हे अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष असतिल.अनुसुचित जमाती आघाडीच्या अध्यक्षपदीचा धुरा अरुण मडावी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.इमरान पठाण यांचे नाव अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदासाठी निवडण्यात आले आहे. बंडु गौरकार हे किसान आघाडीचे अध्यक्ष असतील. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर , भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिह चंदेल माजी आमदार प्रा.अतुल देशकर, अँड संजय धोटे,माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, विद्या देवाडकर, प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्का आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा नेते अशोक जिवतोडे, भाजपा जेष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी,रमेश राजुरकर आदींनी अभिनंदन केले आहे.

CLICK TO SHARE