नवनीत 21 अपेक्षित प्रश्नसंच लिमि.नागपूर या अधीकृत कंपनी च्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स प्रती विक्री करीता कारवाई करण्यात आली

अन्य

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव

गोदिया शहरातील याबाबत थोडक्यात माहिती अशी की, तक्रारदार श्री. किशोर प्रभाकर सेलुकर वय 58 वर्षे, रा. प्लॉट नं. आर्णी रोड यवतमाल, असे असून नवनीत एज्युकेशन लिमिटेड नागपूर येथे रीजनल सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत नवनीत एज्युकेशन लिमिटेड कंपनी ही महाराष्ट्र राज्य कॉपीराईट कायदा 1957 चे कलम 63 अन्वये प्राधिकृत आहे दुसऱ्या कुणालाही नवनीत 21 अपेक्षित प्रश्नसंच प्रकाशित करण्याचा अधिकार नाही… नवनीत 21 प्रश्न संचाचे नकलीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कंपनीतर्फे यांना देण्यात आलेले आहेत. तक्रारदार यांना गोंदिया शहर आणि रामनगर परिसरातील काही झेरॉक्स दुकानामध्ये अधीकृत असलेल्या कंपनीच्या प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स प्रती काढून विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी मा.पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांना याबाबत कायदेशिर कारवाई करण्याकरिता रीतसर परवानगी मागुन पोलिसांची मदत मिळण्याकरिता विनंती केलेली होती. यावरून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांनी याबाबत प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. आणि गोंदिया शहर यांना आदेशित करून तक्रारदार यांना मदत करून कायदेशिर कारवाई करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या…….. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे आदेशांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांची वेगवेगळे पथके तयार करण्यात आलेली होती…. तक्रारदार यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे त्यांचें सोबत जावून दिनांक 16 फेब्रुवारी- 2024 रोजी चे 15.00 ते 20.00 वाजता दरम्यान कारवाई केली असता – *खालील इसम नामे- 1) *शिवाणी झेराक्स चे मालक-* रविकांत हरीप्रशाद जयस्वाल वय 60 वर्षे 2) *रानी झेराक्स चे मालक-* उज्वल तुषारकांत जयस्वाल वय 34 वर्षे 3) *लक्की झेराक्स चे मालक-* चंद्र रमेश जोशी वय 34 वर्षे राहणार तिन्ही – लोहीया वार्ड, एन. एम. डी. कॉलेज रोड, गोंदिया हे त्यांचे मालकीचे झेरॉक्स दुकानामध्ये इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेकाळात उपयोगी येणारे नवनीत 21 अपेक्षित प्रश्नसंचाचे अवैधरित्या विना कायदेशीर अधिकार नसतांना देखील *नवनित 21 अपेक्षीत प्रश्नसंच चे* मायक्रो झेरॉक्स प्रती काढून स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता नकलीकरण/बनावटी तयार करून विक्री करीत असताना व बाळगताना मिळून आले…*त्यांचे मालकीचे दुकानातून खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे -* 👇 *1) शिवाणी झेराक्स मधून* – मायक्रो झेरॉक्स करून ठेवलेल्या एकुण 450 नग प्रती. प्रत्येकी 30/- प्रमाणे एकुण 13,500/- रु. व मायक्रो झेरॉक्स काढण्याकरिता वापरती एक जुनी कॅनान कंपनी झेरॉक्स मशिन किमती अंदाजे 35,000/- रु.२) *रानी झेरॉक्स सेंटर मधुन-* मायक्रो झेरॉक्स 400 नग/ प्रती. प्रत्येकी 30/- प्रमाणे एकुण 12000/- रु. व मायक्रो झेरॉक्स काढण्याकरिता वापरती जुनी क्युसेरा कंपनीची झेरॉक्स मशिन अंदाजे किंमती 25,000/- रु. 3) *लक्की झेरॉक्स सेंटर मधून-* मायक्रो झेरॉक्स एकुण 200 नग/प्रती. प्रत्येकी 30/- प्रमाणे एकुण 6000/-व मायक्रो झेरॉक्स काढण्याकरिता वापरती एक जुनी पांढऱ्या रंगाची कॅनान कंपनीची झेरॉक्स मशीन अंदाजे किमती 70,000/- रूपये *असा एकुण 1 लाख 45 हजार 300/- रुपयांचा मुद्देमाल* हस्तगत करून गुन्ह्याचे अनुषंगाने जप्त करण्यात आलेला आहे… नमुद तिन्ही इसमांनी अधिकृत नवनित एज्युकेशन लिमिटेड कंपनी नागपुर यांचे कॉपी राईट अॅक्ट चे अधिकाराचे उल्लघंन केल्याने नमूद तिन्ही झेरॉक्स दुकान मालक यांचेविरुध्द कॉपी राईट अधिनियम 1957 सुधारित अधि. 1984, आणि 1994 चे कलम 51, 63, 65 अन्वये पो. स्टे. रामनगर येथे अपराध क्रमांक – 39/2024 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे…….. सदर गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत.. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे आदेश मार्गदर्शनाखाली दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे पोउपनि- चण्णावार, पोलीस अंमलदार स.फौ. अर्जुन कावळे, पो.हवा. राजु मिश्रा, तुलसीदास लुटे, प्रकाश गायधने, सुजित हलमारे, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पो.शि. कापसे, म.पो.शि. करोशिया पो.ठाणे गोंदिया शहर यांनी केलेली आहे.

CLICK TO SHARE