छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना आली

अन्य

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगांव

गोदिया ठाणा: संत जयरामदास विद्यालय ठाणा शाळेत (19 फेब्रु.) *छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सी. जी.पाऊलझगडे तर प्रमुख उपस्थितीत शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे,डान्स आणि गीतांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.शिक्षक वर्गातून एच.के.बावनकर आणि बी.एच.राऊत यांनी शिवाजी महाराजांनी कोणत्याही एका जाती धर्माकरिता कार्य केले नसून संपूर्ण प्रजेकरिता कार्य केले असे भाषणातून विचार प्रगट केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श घेऊन सर्वांशी प्रेमाने वागावे असे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन कु. हर्शिका मेश्राम हिने केले तर आभार कु.सुरभी रहांगडाले हिने मानले.

CLICK TO SHARE