एम एस आयुर्वेद महाविद्यालय गोंदिया मध्ये साजरी केली गेली शिव जयंती

अन्य

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव

गोदिया एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कुडवा गोंदिया येथे दिनांक १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६२७ रोजी शिवनेरी येथे झाला.दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा ढोल आणि लेझिम पथक नृत्य सादर करण्यात आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे चे पूजन करून कार्यक्रमा ची सुरुवात झाली.प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नृत्या च्या स्वरुपा मध्ये शिवाजी महाराजांचा जीवन क्रम सादर केला. तसेच भाषण , कविता आणि पोवाडा गायीला गेला. तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. संचालक डॉक्टर सुरेश कटरे सर आणि श्रीमती मिनाक्षी कटरे मॅडम यांचा मार्गदर्शना मध्ये कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्या डॉक्टर जयमाला शिर्के , डॉक्टर वैशाली नाखले, डॉक्टर डेमेंद्र ठाकरे, डॉक्टर जयप्रकाश उके आणि इतर शिक्षक आणि 200 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

CLICK TO SHARE