कोल्हापूरचा विक्रम गायकवाड ठरला आमदार चषकचा मानकरी भाग्यश्री फंड ने पटकाविला मानाचा गदा

खेल

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बक्षिस वितरण कार्यक्रमाने तिन दिवसीय ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेचा समारोपचंद्रपूर : आमदार किशोरजोरगेवार यांच्या संकल्पनेतून तब्बल ४८ वर्षा नंतर चंद्रपूरात आयोजित झालेल्या राज्यस्तरीय महिला व पुरूष कुस्ती स्पर्धेचा बक्षिस वितरणाने समारोप करण्यात आला आहे. त्यापूर्वी आमदार चषकसाठी रंगलेल्या पूरुष सामन्यात कोल्हापूरचा विक्रम गायकवाड विजयी ठरला आहे. तर महिला गटात अहमदनगरच्या भाग्यश्री फंड हिने हा मान पटकविला आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरित करण्यात आले.यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, माजी नगर सेवक नंदू नागरकर, युवा नेते अमोल शेंडे, सायली येरणे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष सलीम शेख, सुभाष बोमीडवार, अल्पसंख्यांक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, चंद्रशेखर देशमुख, शिक्षण विभाग प्रमुख प्रतीक शिवणकर, राम जंगम, करणसिंह बैस, विनोद अनंतवार, सतनाम सिंह मिरथा, विमल कातकर, आशु फुलझेले, स्मिता वैद्य, वैशाली मद्दीवार, डॉ. देवानंद गुरु, अंकुश गुरु, अब्दुल फहीज काजी, विजय पराते, पुंडलिक झूमडे, अरुण तिलसे, विनोद चहारे, गणेश भालेराव, वतन राऊत, वासू देशमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.चंद्रपूर शहर तालीम संघ यांच्या सहकार्याने महाकाली मैदानात आयोजित तिन दिवसीय राज्यस्तरीय महिला व पुरूष कुस्ती स्पर्धा पूरुषांचे ९ वजन गट आणि महिलांचे ८ वजन गट अशा एकूण १७ वजन गटात घेण्यात आली. यात राज्यभरातील नामांकित कुस्तीपटुंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पूरुषांचा ३५ किलो गटात नागपूरचा कुणाल माहूले, ४० किलो वजन गटात कोल्हापूरचा वेदांत विचारे, ४५ किलो वजन गटात कोल्हापूरचा संदेश परीट, ५० किलो वजन गटात भंडाराचा प्रज्वल चौधरी, ५० किलो वजन गटात कोल्हापूरचा दिग्विजय पाटील, ६९ किलो वजन गटात चंद्रपूरचा हितेश सोनवणे, ६५ किलो वजन गटात कोल्हापूरचा सुशांत पाटील, ७० किलो वजन गटात सांगलीचा प्रकाश कोळेकर यांनी प्रथक क्रमांक पटकिवला तर महिला ३३ किलो वजन गटात कोल्हापूरची रोहिणी देवबा, ३६ किलो वजन गटात पूणेची गायत्री शिंदे, ४० किलो वजन गटात साताराची साक्षी सरगर, ४४ किलो वजन गटात जालनाची वैष्णवी सोळंके, ४८ किलो वजन गटात कोल्हापूरची श्रावणी लव्हटे, ५२ किलो वजन गटात सोलापूरची शिवानी कर्चे, ५७ किलो वजन गटात अहमदनगर ची धनश्री फंड हिने प्रथक क्रमांक पटकावला आहे.सदर स्पर्धेमुळे चंद्रपूरातील कुस्तीगीरांना मोठे व्यासपीठ मिळाले असून चंद्रपूरातील कुस्तीगीरांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. भविष्यात चंद्रपूरातूनही कुस्तीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे या दृष्टीने चंद्रपूर शहर तालीम संघाने काम करावे असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. रविवारी पार पडलेले अंतिम सामने पाहण्यासाठी नागरिकांनी महाकाली मैदानात मोठी गर्दी केली होती. आमदार चषकासाठी रंगलेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या विक्रम गायकवाड याने सोलापूरच्या प्रविण वाकडे याचा तांत्रिक गुणाने (१०- ०) ने पराभव करत २०२४ चे आमदार चषक पटकाविले आहे. यावेळी कुस्ती पंच कमिटीचे डायरेक्टर धर्मशील काटकर, मुंबईचे रंगराव हरणे, भंडाराचे रामदास वडीचार, नागपूर चे सतीश वाघमारे, सुहास बनकर प्रफुल चौधरी, नेहा बोकडे, धारनी येळने, नागपूरचे शिवम समुद्रे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

CLICK TO SHARE