जी.बी.एम.एम हायस्कूल मध्ये कॅम्पस बर्ड काउन्ट

अन्य

प्रतिनिधी:करीम खान 9970336886 हिंगणघाट

निसर्गसाथी फाऊंडेशन,हिंगणघाट व महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे जागतिक ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउन्ट व कॅम्पस बर्ड काउन्ट निमित्त मोहता हायस्कूल येथे बर्ड काउन्ट करण्यात आले यात 15 प्रजाती चे पक्षी आढळले.या कार्यक्रमात निसर्गसाथी प्रविण कडू,चैतन्य वावधने यांनी शाळेतील प्रांगणातील पक्षांचा नोंदी केल्या . या बर्ड काउन्ट मध्ये शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सुध्दा सहभाग घेतला तसेच शिक्षक मा.किशोर उकेकर, मा. अनिस बेग सर यांनी विशेष सहकार्य केले. 1. गोल्डन ओरिओल( 2),2. परपल सनबर्ड ( 2) 3.कॉपरस्मित बारबेट ( 5) 4. लाफिंग डव (8) 5.व्हाईट ब्रॉड वेगटेल ( 2) 6. ब्लू रॉक डव (12) 7.येलो फुटेड पिजन (10) 8.ग्रीन बी ईटर (10) 9.कॉमन मैना (1) 10. सिल्वर बिल (7) 11.हाऊस स्पेरो (2) 12. शिक्रा (1) 13. एशियन प्रिनिया (2) 14. रेड वेंटेड बुलबुल (5) 15. परपल रम्पड सनबर्ड (1) या पक्षांचा आणि त्यांचा संख्येचा नोंदी घेण्यात आल्या यात 15 प्रजातीचे पक्षी आढळून आले या प्रसंगी शाळकरी मुलांना दुर्बिणीतून पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता आला त्यांना प्रविण कडू,चैतन्य वावधने यांनी मार्गदर्शन केले .या प्रसंगी दोन पक्षांचे घरटी सुध्दा आढळली ती परपल सनबर्ड आणि व्हाईट ब्रॉड वागटेल यांची होती . विद्यार्थ्यानी पक्षी जीवना बद्दल प्रश्न विचारले जागतिक कॅम्पस बर्ड काउन्ट निमित्त आपल्या शाळेत आढळणारे पक्षी प्रजाती व त्यांची संख्या मोजून घेणारी मोहता विद्यालय हे हिंगणघाट शहरातील पाहिले व एकमेव विद्यालय ठरले आहे.

CLICK TO SHARE