श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली

अन्य

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

नागपुर:(दि.19)आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नागपूर शहरातील गांधी गेट येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले, तसेच परिसरात उपस्थित सर्व शिवभक्त लोकांना लाडू चे वाटप करण्यात आले ,तसेच इंग्लिश खाडी विक्रमी वेळेत पोहून पार करणाऱ्या जयंत दुबळे या जलतरन पटू चा सत्कार करण्यात आला, यावेळी शिवछत्रपती युवा संघटना, शिवमाता जिजाऊ प्रतिष्ठान,समूह घोष संस्था या संघटनेचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते ,शिवराज प्रतिष्ठान नागपूर चे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी, मनसे उपाध्यक्ष किशोर सरायकर, सामाजिक नेते प्रशांत निकम,उमेश बोरकर,महेश माने,धीरज (अण्णा)गजभिये , संगीता सोनटक्के,सुनीता बोडके,मोहित देसाई,श्याम रहांगडाले,निशांत चौहान,अभय व्यवहारे,अतुल मेहरे,वैशाली फुलझेले व इतर उपस्थित होते

CLICK TO SHARE