संभाजी ब्रिगेड ‌बल्लरपुर तर्फे शिवजयंतीची जय्यत तयारी

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर,: बल्लारपूर भारतामधील ४०० वर्षाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून स्वतंत्र करणारे भारतभाग्यविधाता छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वि जयंती जगभरात साजरी होत आहे.बल्लारपुर शहरात गेल्या दोन दशकांपासून संभाजी ब्रिगेडची शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा राहिलेली आहे. यंदाही शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून शहरात नागरीकांमध्ये त्याप्रती उत्साह दिसून येते आहे.दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नगरपरिषद स्थित शिवस्मारक येथे मानवंदना देण्यात येईल. संध्याकाळी ४ वाजता शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे संध्याकाळी ७ वाजता झांसी राणी चौक येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन संभाजी ब्रिगेड बल्लारपूरतर्फे करण्यात आले आहे.दि. २० फेब्रुवारी ला सायंकाळी ६ वाजता झांसी राणी चौक येथे पवनपआल महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमांत उदघाटक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिहे राहणार असून अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ चेतन खउटएमआटए राहणार आहे.तर विशेष अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख डॉ प्रा दिलिप चौधरी असणार आहेत.यंदाच्या या शिवजन्मोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष साहिल धिवे कार्याध्यक्ष प्रशासन संकेत चौधरी. प्रवक्ता रोहित चुटे.शहरसचीव प्रतिक वाटेकरी यांनी केले आहे.

CLICK TO SHARE