जोरगेवारअखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूरात छत्रपतीशिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ स्मारक व्हावे ही चंद्रपूरकरांची जुनी इच्छा आहे. तीच आमची ही इच्छा आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. आपण प्रशासनाला जागाही सुचविली आहे. मात्र अद्यापतरी हे स्मारक उभे झाले नाही ही चंद्रपूरकरांची खंत आहे. मात्र या स्मारकासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.अखिल भारतीय मराठा महासंघ, चंद्रपूर मराठा समाज च्या वतीने तुकुम येथील सभागृहात आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराज अहिर, ग्रामविकास अधिकारी प्रफुल निंबाळकर, मराठा महासंघाचे अध्यक्ष सुनिल चोपडे, महिला अध्यक्षा मंगला माने, भगत सिंग मालसुरे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, सुनिल निंबाळकर, उज्वला नलगे, प्रभा शितोके, माजी नगर सेवक राजु अडपेवार, पुनमचंद्र तिवारी, सुरेश धारकर, यांची प्रमूख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक समीर लेनगुळे यांची प्रमुख वक्ता म्हणून उपस्थिती होती.यावेळी पूढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात. चंद्रपूर जिल्ह्याला जवळपास ५०० वर्षाहून जुना इतिहास आहे. असे असतांनाही आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहू शकले नाही ही खंत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखविली. चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक व्हावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न राहिले आहे. या करिता आपण जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सोबत संबंधित सर्व अधिका-यांची बैठक घेतली होती. यावेळी शिवप्रेमींनी स्मारकासाठी सुचविलेल्या जवळपास १० जागा आपण सुचविल्या होत्या. याचा पाठपुरावाही आपण सातत्याने करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.मराठा समाजाचा शुरविर इतिहास राहिला आहे. या समाजानेही शिवस्मारक कसे असावे या बाबत सुचना करणे अपेक्षित असल्याचे ते यावेळी म्हणाले. मराठा समाज नेहमी शिव छत्रपती महाराज यांचा गौरवशाली इतिहास विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजापूढे आण्यासाठी प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकहिताचे विचार आपण युवा पिढी पर्यंत पोहचवित आहात. या समाजाने जागा उपलब्ध करुन दिल्यास तेथे समाज भवन निर्माण करण्यासाठी आपण ५० लक्ष रुपये देणार अशी घोषणा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

CLICK TO SHARE