ग्रामपंचायतीच्या वाचानाल्यामुळे मिळाली सरकारी नोकरी

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

येथील ग्रामपंचायतीमार्फत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय उघडले आहे. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने अभ्यास करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी यशला गवसणी घातली असून पाचही विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरीत गगनभरारी घेतली आहे.यशस्वी तरुणांचा ग्रामपंचायतीच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच नितीन चंदनखेडे, सदस्य सतीश काळे, सचीन पारसडे, निखील खाडे, सुनीता लीचडे, आशिष साखरकरयांच्या हस्ते पाचही युवकांना सन्मानित करण्यात आले. पाचही विद्यार्थी अत्यंत सामान्य कुटुंबातील असून त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.मात्र त्यांनी परिस्थितीवर मात करीत यशाला गवसणी घातली. खुशाल जोगेश्वर वैद्य याची निवड आरोग्य सेवक म्हणून वर्ध्याला, विशाल रामदास सुरकार याची निवड शिक्षक पदासाठी न.प. धुळे, सूरज गोपाळ बगवे आणि सौरभ कांबळे यांची निवड रेल्वे विभागात तर सुमित बांगडे याची निवड डीएमइआर विभागात झाली आहे. त्यांचे कौतुक होत आहे.

CLICK TO SHARE