घातक शस्त्रे-लोखंडी तलवारी बाळगल्याप्रकरणी एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

क्राइम

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव

गोदिया:स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा घालून कारवाई करत पोलीस ठाणे- गंगाझरी हद्दीतील मौजा- फत्तेपूर येथील एका ईसमास बेकायदेशिररित्या विनापरवाना स्वतः चे घरी घातकशस्त्र लोखंडी तलवारी एकूण- 11 नग किंमती अंदाजे 11,000/- रूपयांच्या बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेवून जेरबंद केले आहे… याबाबत सविस्तर वृत्त असे की,– पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांनी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते………आणि या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्था. गु . शा. पथकाद्वारे जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वृत्त्तीच्या लोकांचा शोध घेवून अवैधरित्या शस्त्रे/ हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचेवर पाळत/नजर ठेवण्यात येत होती…. त्यानुसार दिनांक- 20/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय सुत्राद्वारे बातमी मिळाली होती की, *ईसम नामे- बादल खोब्रागडे रा. फत्तेपूर* याने त्याच्या स्वतः चे घरी भविष्यात घातपात घडवून आणण्याचे उद्देश्याने अवैधरित्या घातक शस्त्रे तलवारी/कोयते लपवून ठेवलेल्या आहेत…..अश्या मिळालेल्या खात्रीशिर गुप्त माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी स्था.गु. शा. पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून अवैधरीत्या घातक हत्यार/ शस्त्रे (तलवारी/कोयते) बाळगणारा *इसम नामे- बादल दलित खोब्रागडे वय 27 वर्षे राहणार- फत्तेपूर ता. जि. गोंदिया* याचे घरी घातक शस्त्र तलवारी/ कोयते बाबत दिनांक 20/02/2024 चे दुपारी 13.05 वाजता सापळा रचून छापा घालून कारवाई केली असता- त्याचे राहते घरी घरझडतीत स्वयंपाक खोलीतील कोपऱ्यात एका प्लास्टिक बोरीत ज्यात दोन गोणपाटाच्या पोतडीमध्ये गुंडाळून , लपवून ठेवलेल्या 11 नग लोखंडी तलवारी स्टील मुठ आणि लोखंडी पाता असलेल्या किंमती अंदाजे 11 हजार रुपयांच्या विनापरवाना बेकायदेशीर रित्या बाळगतांना मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आले…. ताब्यात घेतलेला ईसम नामे – बादल खोब्रागडे यास घातक हत्यार/शस्त्र (लोखंडी तलवारी) बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याचेकडे मिळुन आलेल्या लोखंडी तलवारी बाबत कसलेही कायदेशीर कागदपत्रे, अगर परवाना नसल्याचे सांगून त्याचा *आत्तेभाऊ ईसंम नामे – गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वाहाणे राहणार – वाजपेयी वॉर्ड, गोंदिया* याची असल्याची सांगून घरी आणून ठेवल्याचे सांगितले……….. मिळुन आलेला मुद्देमाल आरोपी चे कब्ज्यातून हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे.. *आरोपी ईसम नामे* -➖➖➖➖➖➖➖ *1) बादल दलित खोब्रागडे वय 27 वर्षे राहणार- फत्तेपूर ता. जि. गोंदिया** *2) गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वाहाणे राहणार – वाजपेयी वॉर्ड, गोंदिया** *यांचेविरूद्ध पोलीस ठाणे गंगाझरी येथे अपराध क्रमांक- 58/2024* कलम *4, 25 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 37 (1), (3), मुंबई पोलीस अधिनियम सन 1951, कलम 135 म.पो.का.* अन्वये मपोउपनि- सायकर, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे……. मिळुन आलेला आरोपी ईसंम नामे-बादल खोब्रागडे यास मुद्देमालासह गंगाझरी पोलीसांचे स्वाधिन करण्यात आले आहे..सदर गुन्ह्याचा पुढील तपास गंगाझरी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये स्था. गु. शा. प्रभारी पो.नि.श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. चे पथक- पोउपनी. महेश विघ्ने, मपोउपनि- वनिता सायकर, यांचे नेतृत्वात सफौ.अर्जुन कावळे, पोहवा. राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, महेश मेहर, सोमेंद्र तुरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, पोशि अजय रहांगडाले, घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी केलेली आहे.

CLICK TO SHARE