हिंगणघाट येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सवात साजरी

अन्य

हिंगणघाट: प्रतिनिधि :सचिन वाघे

हिंगणघाट :- संत गाडगेबाबा चौकात संत गाडगेबाबा यांची जयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परिट समाज चे अध्यक्ष संजय भोंग,प्रमुख पाहुणे राजर्षि शाहु महाज पतसंस्थे चे अध्यक्ष रविद्र भगत व लोक जनशक्ति पार्टि {रा} चे वर्धा जिल्हा अध्यक्ष केशव तितरे यावेळी नव युवक परिट समाज कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या मुर्तिला मालार्पन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी संत गाडगे बाबा यांचे जिवन कार्या वर प्रकाश टाकला. केशव तितरे यांंनी संताचे कार्य व आजची स्थिती यांची सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भोंग यांनी प्रबोधनातुन महाराजानी स्वच्छता ठेवल्याने आपला परिसर सुंदर कसा होईल या बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक सुभाष काटकर यांनी केले. कार्यक्रमाला परिट समाज बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ज्ञानेश्वर काटकर यांनी मानले.

CLICK TO SHARE