वडनेर येथे पिण्याचे थंड व शुद्ध पाणी केंद्राचे उदघाटन संपन्न

सोशल

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

वडणेर :- ग्रामपंचायत सरपंच कविता विनोद वानखेडे यांच्या हस्ते वडनेर गावातील महिलांना 2500 पिण्याचे पाणी कॅन यांचे वितरण व पिण्याचे शुद्ध व थंड पाणी केंद्राचे उद्घघाटन संपन्न झाले वडनेर ग्रामपंचायत सरपंच कविता विनोद वानखेडे यांनी १५ वित्त आयोगाअंतर्गत पाणी केंद्र व कॅन वितरण करण्याचा ठराव मंजूर करून वडनेर येथील जनतेची गरज लक्षात घेऊन आरोग्य चांगले सुदृढ राहावे याकरिता वडनेर गावांमध्ये कविता विनोद वानखेडे सरपंच ग्रा वडनेर व माजी सरपंच विनोद वानखेडे यांनी स्वतः घरोघरी जाऊन ग्रामपंचायत आपल्या दारी योजना राबवून प्रत्येक घरी जाऊन महिलांना पिण्याच्या पाण्याची कॅन वितरण केल्या वडनेर गावांमधील हॉटेल सर्व दुकाने शाळा महाविद्यालय पान टपरी तसेच शासकीय कार्यालय धार्मिक स्थळे अशा ठिकाणी व जे बाहेरगावावरून वडनेरा गावांमध्ये राहिला आले अशा सुद्धा नागरिकांना मोफत कॅन वाटप केल्या तसेच त्यांना आवाहन सुद्धा केले की आपण सर्व नागरिक आप आपल्या वॉर्ड मधील थंड पाणी केंद्रावर जाऊन एटीएम मशीनद्वारे पाच रुपये टाकून वीस लिटर कॅन भरून आणावी पिण्याच्या शुद्ध थंड पाणी केंद्राचे उदघाटन कविता विनोद वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन मलंगनाथ बाबा परिसर, हनुमान मंदिर चापले लेआऊट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुतळा परिसर,बाजार चौक, येथे संपन्न झाले उदघाटन निमित्ताने सर्व नागरिकांना मोफत शुद्ध व थंड पाणी देण्यात आले कविता विनोद वानखेडे यांनी प्रत्येक वार्डमधील नागरिकांना सांगितले की हे पाणी सर्वांसाठी आहे यांचा उपयोग सर्वांनी घ्यावा व या शुद्ध व थंड पिण्याच्या केंद्राचे चांगल्या पद्धतीने व काळजीने उपयोग करावा तसेच उपस्थित विनोद वानखेडे माजी सरपंच ग्रामपंचायत वडनेर यांनी नागरिकांना शाश्वत केले की हे केंद्र नियमित गावकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू राहणार व हे केंद्र चांगल्या पद्धतीने चालविले जाईल याची जबाबदारी नागरिकांची व ग्रामपंचायत प्रशासनाची राहील गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान सरपंच कविता विनोद वानखेडे यांनी नागरिकांना केले वडनेर ग्रामपंचायत ने पिण्याच्या पाण्याची कॅन वितरणाचा घरोघरी जाऊन राबवलेला उपक्रम हा जिल्ह्यातील एकमेव वडनेर ग्रामपंचायत ने राबविलेला उपक्रम असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे गावातील अनेक नागरिकांनी व महिलांनी सरपंच कविता विनोद वानखेडे यांच्याबाबत गौरवास्पद उदगार काढले आहे तसेच नागरिकांनी आभार सुद्धा मानले पिण्याच्या थंड व शुद्ध पाणी केंद्राच्या उदघाटन व पाणी कॅन वितरणाला उपस्थित सरपंच ग्रामपंचायत वडनेर कविता विनोद वानखेडे सरपंच , विनोद वानखेडे माजी सरपंच ग्रामपंचायत वडनेर तथा अध्यक्ष हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) राजेंद्र भोरे ,उपाध्यक्ष हिंगणघाट तालुका खरेदी विक्री संघ हरिदास रामटेके, ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत वडनेर कृष्णा महाजन, अध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर सुभाष शिंदे, उपसरपंच ग्रामपंचायत वडनेर आरिप शेख, वर्षा भोयर रीना तागडे, मंदा आत्राम ,वनिता कळसकर, नम्रता भगत दिपाली भुते, प्रियंका दिवे, विनोद येळने ,हनीफ खान पठाण ,संजय भोयर, सुनील कळसकर, अमित झाडे ,सुरेश काळे ,सुधाकर उमाटे, विशाल दिवे, दशरथ दुर्गे, नलिनी मानकर, संगीता महाजन, आशिष जोगे,राजेंद्र सुरकार,गणेश सिडाम, बबलू जीवतोडे ,शंकर मुन, अजय मेहकुरे ,एकनाथ उमाटे, हेमंत वैतागे, सुनील उरकुडे,बंडू धाबर्डे,सुनील लोहकरे, विनोद मेंढे, तसेच अनेक नागरिक उपस्थित होते

CLICK TO SHARE