पोलिस स्टेशन जलालखेडा यांची दमदार कामगिरी चार तासात आरोपी ताब्यात,बस मध्ये चोरी करणारी टोळी गजाआड

क्राइम

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलाखेडा:(दि.22)रोजी सकाळी सुमारे 10.00 वाजता दरम्यान अज्ञात आरोपींनी जलालखेडा बस स्थानक वर प्रायव्हेट बस मधून वरील ट्रॉली बॅग चे कुलूप तोडून बॅग मध्ये ठेवलेली पाच तोळ्याची सोन्याची पोत किंमत अंदाजे 30,000 रुपये व दोन ग्रॅम सोन्याची पोत किंमत अंदाजे 12,000 रुपये नगदी 3,100 रुपये असा एकूण 45,100 रुपयाचा माळ अज्ञात आरोपी त्यांनी बस मधून चोरला असे सौ.नयना शेखर मोगरे रा.वरूड जिल्हा.अमरावती यांचे तोंडी तक्रार वरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला जलालखेडा येथे बस स्थानक वर स्थानिक नागरिकांन कडून पोलिसांना मिळालेली माहित वरून काही अज्ञात इसम संशयापद दिसत आहे अश्या माहिती वरून जलालखेडा पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन एक अज्ञात आरोपी ताब्यात घेऊन त्यास कसोशीने विचारपुस करून सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले आरोपी जवळून पाच ग्रॅम सोन्याची पोत किंमत अंदाजे 30,000 रुपये व दोन ग्रॅम सोन्याची पोत किंमत अंदाजे 12,000 रुपये नगदी 3,100 रुपये असा एकूण 45,100 रुपयाचा माल हा पंचासमक्ष जप्त केले अटक करण्यात आलेले आरोपींचे नाव 1) नासी जम्मा शेख वय वर्ष 40, 2) सानु फुल हसन शेख वय वर्ष 25, 3) नवीन खलील अली वय वर्ष 23, 4) शहादत अली रईस अली वय वर्ष 30, 5) सुभान मोहम्मद हुसेन वय वर्ष 25, 6) जुल्फाकार अब्दुल अजीज वय वर्ष 40 उत्तर प्रदेश सदर आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन जलालखेडा येथे अप क्र. 78/2024 कलम 379.34 भावंदी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून करून सदर आरोपींचा 26/2/2024 पर्यंतचा पी.सी.आर घेण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही ही.मा.पोलिस अधीक्षक साहेब, नागपुर ग्रामीण मा.अप्पर पोलिस अधीक्षक साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब (काटोल वी काटोल) यांच्या मार्गदर्शनात जलालखेडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार सपोनी/सी.बी.चौहान साहेब, पोउपनी/जोशी साहेब, पोलिस अंबलदार पुरोशोत्तम धोंडे,निलेश खरडे,पोना आशिष हिरूडकर,मदतीने करण्यात आले समोरील गुन्ह्याचा तपास सपोनी/सी.बी.चौहान साहेब यांच्या मार्गदर्शनात पोउपनी अनिल जोशी हे करत आहे

CLICK TO SHARE