निसर्गसखा संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक कन्यका सभागृहात निसर्ग सखा महोत्सवाचे आयोजन

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

गोंडपिपरी तालुक्यातील आणि विषेशतः पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या निसर्गसखा संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक कन्यका सभागृहात निसर्ग सखा महोत्सव-२०२४ चे आयोजन करण्यात आले.आज याठिकाणी बक्षीस वितरण समारोहास उपस्थित राहून सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेकांचा संस्थेच्या वतीने सन्मान केला. निसर्गसखा या पर्यावरणस्नेही संस्थेने मागील १५ वर्षांपासून सुरू ठेवलेला पर्यावरण संवर्धन व लोकजागृतीचा वसा यापुढेही जोपासावा. संस्थेच्या भरभराटीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा! अशी भावना याठिकाणी बोलतांना व्यक्त केली. यावेळी माझ्यासमवेत माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतन गौर, संस्थाध्यक्ष दिपक वांढरे, ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, जितेश कुळमेथे, कृष्णा मसराम, सुहास माडूरवार, विनोद देशमुख, राकेश पुन, प्रशांत येल्लेवार, कार्तिक गोणलावार, स्वप्निल बोनगीरवार, विनोद नरेन्दुलवार, महेश जुमनाके, प्रदिप गेडाम, तुकेश बानोडे, श्री. बांबोळे सर, श्री. गिरीया सर, पंकज चिलनकर आदींसह गोंडपिपरीवासीयांची उपस्थिती होती.

CLICK TO SHARE