ग्रामपंचायत जब्बार टोला येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरचे उद्घाटन

अन्य

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव

गोदिया दिनांक 23 फेब्रूवारी का एम एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल गोंदिया अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गोंदिया यांच्यातर्फे ग्राम पंचायत जब्बार टोला येथे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर चे उद्घाटन करण्यात आले. दिनांक 23 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना चे हे शिबीर राहील . या शिबिरा दरम्यान आंगनवाड़ी मधील मुलांची तपासणी, जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांची तपासणी. सामान्य आरोग्य तपासणी, स्वछता अभियान, श्रमदान इत्यादि कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच श्री मनीष सिंह गहरवार , श्रीमती ईश्वरी धनलाल चीखलोंढे ग्राम पंचायत सदस्य, श्रीमती ज्योती आश्विन शहारे , श्री किशोर शहारे , चमनलाल जी लिल्हारे तंटा मुक्ती सदस्य तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर डेमेन्द्रकुमार ठाकरे ,श्री सुनील रहांगडाले, डॉ.जयप्रकाश उके बालरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र रहांगडाले आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

CLICK TO SHARE