स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून देशी-विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या धडक कार्यवाही

क्राइम

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून देशी-विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर धडक कार्यवाही करीत कारसह जु.किं. 5,17,900 रू चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत.

ब्यूरो चीफ/वर्धा

हकिकत याप्रमाणे आहे कि, स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पुलगाव पथक यांनी देशी-विदेशी दारूची विक्री करीता वाहतुक करणाऱ्या आरोपीवर मौजा नाचणगाव शिवार पुलगाव ते देवळी रोडवर सापळा रचुन दारूबंदीबाबत प्रो. रेड केला असता, आरोपी हा मोक्कावर रंगेहाथ कार ने दारूची वाहतुक करतांना मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन 1) एक सिल्व्हर रंगाची मारूती स्विफ्ट VXI कार क. MH-02/JP-9960 किं. 4,50,000 रू. 2) विदेशी दारूने भरलेल्या ओ.सी ब्लू. कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल. च्या. 48 सिलबंद शिशा, कि. 16,800 रु 3) सिमला देशी दारूने भरलेल्या प्रत्येकी 180 एम.एल. च्या 168 सिलबंद शिशा, कि 25,200 रू 4) एक सॅमसंग कंपनीचा जांभळ्या रंगाचा स्मार्ट फोन कि. 15,000 रू 5) नगदी 10,900 रू असा जु.किं. 5,17,900 रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी 1) दिनेश नारायणदास माटा, रा. सिंध्दी कॉलनी वार्ड क 6 पुलगाव, जि. वर्धा व आरोपीस दारू मालाचा पुरवठा करणारा विटाळा तह, धामनगाव जि. अमरावती येथील उदय बार चा मालक 2) अंकित जैयस्वाल रा. सांवगी मेघे यांचेविरूध्द पो.स्टे. पुलगाव येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरुल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. संजय गायकवाड सा. यांचे निर्देशाप्रमाणे, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली

CLICK TO SHARE