पवित्र रमज़ान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नागरी सुविधा पुरवा,वसमतच्या सकल मुस्लिम समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोशल

प्रतिनिधी: अशोक इंगोले (हिंगोली)

वसमत :मार्च महिन्यापासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु होवुन एप्रिल महिण्यात रमजान ईद तसेच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार असल्याने शहरात स्वछता,पाणी पुरवठा,विधुत पुरवठा आदी आवश्यक नागरी सुविधा मुबलक प्रमाणात पुरवण्याची लेखी मागणी वसमत येथील सकल मुस्लिम समाजाने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहेउपविभागीय अधिकारी वसमत मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या लेखी निवेदणात रमजानच्या महिण्यात  शहरात दररोज नियमीत साफसफाई करणे तसेच  प्रत्येक मस्जीद जवळील साफसफाई,विधुत पुरवठा होने आवश्यक आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाण्याचा मुबलक पाणी साठा उपलब्ध असुन योग्य नियोजन करुन रमजान माहिन्यात एक दिवस आड नियमीत पणे पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा,प्रत्येक प्रभागात बंद असलेले एलईडी लाईट दुरुस्ती करुन ते चालू करावे ज्या विधुत पोलवर लाईट नाही त्या ठिकाणी नविन एलईडी तात्काळ बसविण्याची व्यवस्था व्हावी,शहरात ज्या ठिकाणी बुध्द विहार आहेत त्या ठिकाणी सुध्दा नियमीत साफसफाई करणे व त्या ठिकाणी एलईडी नविन बसविणे,नादुरुस्न असल्यास दुरुस्ती करुन पुर्ववत चालु करणे.तसेच  ईद व जयंतीच्या दिवशी पहाटे नळाला पाणी पुरवठा करावा,रमजानच्या महिण्यात रोजा (उपवास) सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या फळ,मेवा विक्रेत्यांसाठी मुस्लीम भागात हैकर झोन निश्चित करुन फळ,मेवा विक्रेत्यांना आवश्यक सुविधा त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावी.आदी नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधीत विभागास आदेशीत करण्याची विनंती निवेदणात करण्यात आली आहेनिवेदणावर वसमत शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख अलीमोद्दीन,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) वसमत शहराध्यक्ष शेख आय्युब भाई,एमआयएम वसमत शहराध्यक्ष इरफान पठान,काँग्रेस अल्पसंख्याक सेल वसमत शहराध्यक्ष अखिल उर्फ बबलू,समाजवादी पार्टी शहराध्यक्ष शेख मजहर,मौलाना महेफुज रहेमान,माजी उपनगराध्यक्ष खैसर अहेमद,म.रियाजोद्दीन कुरेशी,माजी नगर सेवक शेख मोहसीन,रविकिरण वाघमारे,नदीम सौदागर,अ.सत्तार मजीद,शेख हारुन,शेख युनुस पॉपुलर,शेख मुदस्सर,शेख अहेमद, रशीद जानीमिया,आवेस अन्सारी,अमजद खान नम्मू,रविराज डोळस, शेख इरफान,शेख यासिन आदी समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत

CLICK TO SHARE