मारोती थोरात वसमत चे नवीन उपविभागीय पोलिस अधिकारी

अन्य

प्रतिनिधी : अशोक इंगोले (हिंगोली)

हिंगोली : वसमत उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी मारोती थोरात यांची नियुक्ती करण्यात आली असून गुरुवारी संदिपान शेळके यांना निरोप देण्यात आल्याने मारोती थोरात यांनी वसमत उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे हिंगोली जिल्ह्यात महत्त्वाचा असलेल्या वसमत उपविभागीय पोलीस कार्यालयात तत्कालीन अधिकारी पियुष जगताप, शशिकिरण काशीद, यांच्यानंतर अलीकडे किशोर कांबळे यांनी सक्षमपणे कारभार सांभाळला किशोर कांबळे हे सेवानिवृत्त झाल्याने संदिपान शेळके यांनी पदभार स्वीकारला तर गुरुवारी तेही सेवानिवृत्त झालेजिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सक्षम अधिकारी म्हणून मारोती थोरात यांची वसमतच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नियुक्ती केली आहे गुरुवारी मारोती थोरात यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला मागील काळात थोरात यांनी हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख म्हणून काम पाहिला आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक कारवाया केल्यागुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वसमत येथे आयोजित कार्यक्रमात संदिपान शेळके यांना निरोप तर मारोती थोरात यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या वेळी उपविभागातील वसमत शहर,वसमत ग्रामीण, हट्टा,कुरुंदा, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री.मांजरमकर,श्री काचमांडे,श्री बोराटे,श्री गोपींनवार,श्री निरदोळे,फौजदार राजु सिद्दिकी,सह पोलीस हे.काँ.रूपेश गरूड,संतोष दुमाणे, राजीव चव्हाण,शंकर हेंद्रे, रवि ढेंबरे,गणेश दळवी, ज्योती काळे मँडम आदींनी दोन्ही अधिका-यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या

CLICK TO SHARE