आचारसंहिता सुरू होण्याअगोदर शेतकऱ्याचे अनुदान खात्यात जमा करा अन्यथा आक्रोश जनशक्ति संघटना करणार आंदोलन

सोशल

प्रतिनिधि:रवि वाहने शेंदुर्जनाघाट (अमरावती )

या देशाचा पालक आपल्या सर्वांचा पोशिंदा शेतकरी आज नाही उद्यातरी परिस्थिती बदलेल आशावादी प्रवृत्ती ठेवत प्रकोपणाऱ्या निसर्ग आणि सरकार वर आशेने विश्वास ठेवतो आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वतःच शासन दरबारी झिजतो. नापिकी असो की पडलेले बाजार भाव असो आपल्या उदर्निवाहाची सोय व्हावी यासाठी सतत धडपडत राहणाऱ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे दुष्काळ जाहीर करूनही गत 4 महिन्यापासून अनुदान शासनाने वाटप केले नाही पी .एम. व सी. एम. किसान सन्मान निधीचे अनुदान कित्येक महिने लोटूनही अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाही. पुढे लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आचार संहिता लागू होण्याअगोदर जर शासनाने शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान दिले नाही तर वरूड तालुक्यातील सर्व शेतकरी आणि संघटना एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचा आंदोलनात्मक पवित्रा अवलंबणार आहे त्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन तालुक्यातील शेतकरी आणि आक्रोश जनशक्ती संघटने तर्फे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी , मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांसह आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशीलभाऊ बेले आणि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE