ग्रा.प.सौंदड येथे विशेष ग्राम सभेतून आशा सेविकेची नियुक्ती

अन्य

सरपंच हर्ष मोदी यांचा पारदर्शक कारभार नागरिकांच्या मतदानातून केली निवड

जिल्हा प्रतिनिधी / राहुल हटवार गोंदिया

सडक अर्जुनी तालुक्यातील स्तुत्य उपक्रमासाठी प्रसिद्धीस आलेली सौंदड ग्राम पंचायतीची २८ फेब्रुवारी रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेत आशा सेविका,अतिरिक्त रोजगार सेवक आणि जलदूत मित्राची निवड लोकसहभागातून करण्यासाठी आयोजित केली होती.सरपंच हर्ष मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्राम सभेत एकूण ५७३ नागरिकांची उपस्थितित नोंदविण्यात आली.यामध्ये सर्वप्रथम आशा सेविकेसाठी मागविलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली.यामध्ये २ जागेसाठी एकूण १६ पात्र अर्ज स्वीकार करण्यात आले. एक जागा सौंदड (सर्वसाधारण) आणि एक जागा शास्त्री वार्ड करिता राखीव होती. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी ९ पात्र अर्ज तर शास्त्री वार्ड राखीव जागेकरिता ७ अर्ज स्वीकारण्यात आले.दोनही जागेसाठी सर्वोकृष्ट उमेदवारासाठी सर्व गुणांचा विचार करता ३ उमेदवारासाठी ग्राम सभेतील उपस्थित १५५ नागरिकांनी मतदान केले. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी किरण सुरज भूमके यांची निवड करण्यात आली असून माधुरी विश्वजित राऊत हे प्रतीक्षा यादीत निवड सर्वानुमते करण्यात आली. तर शास्त्री वार्ड राखीव जागेसाठी प्रियांका शिल्पेश शहारे यांची निवड करण्यात आली असून प्रतीक्षा यादीत आरती आकाश शहारे यांचा समावेश करण्यात आले.याशिवाय या सभेत अतिरिक्त रोजगार सेवक पदासाठी चर्चा करण्यात आली.परंतु नागरिकांनी यासाठी सर्वानुमते नकार दर्शविल्याने अध्यक्ष हर्ष मोदी यांनी अतिरिक्त रोजगार सेवकाची नियुक्ती रद्द केली. दुसरीकडे जलदूत मित्र या पदासाठी शासनाने दिलेल्या अटी शर्ती जाचक असल्याने एवढे शिक्षण असलेले तरुण ग्रामीण भागात नाही त्यामुळे सौंदड येथील होणाऱ्या या पदाची सुद्धा एकही पात्र उमेदवारचे अर्ज न आल्याने पदरिक्त ठेवण्यात आले.आशा सेविका, रोजगार सेवक या पदावर असणारी व्यक्ती नागरिकांच्या नजीकचा असल्याने या पदावर नियुक्ती सुद्धा नागरिकांच्या समन्वयाने करण्यात आली व विशेष ग्राम सभेचे आयोजन करून पारदर्शक पद्धतीने करण्यात आली असे मत सरपंच हर्ष मोदी यांनी व्यक्त केले.

CLICK TO SHARE