दिंडोरा बॅरेज प्रकल्पातील शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा,अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे आमदार प्रतिभाताई धानोरकार यांची मागणी

अन्य

प्रतिनिधी — पवन ढोके (वरोरा)

दिंडोरा बॅरेज प्रकल्पातील मागण्यांसंदर्भात आज विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समितीकक्षात अतिरिक्त मुख्य सचिव कपूर साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत दिंडोरा बॅरेज प्रकल्पातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वरोरा तालुक्यातील दिंडोरा बॅरेज प्रकल्पामुळे बाधित गावांची तात्काळ पुनर्वसन करुन मोबदला देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. १९९६ मध्ये प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहीत करुन त्यावेळेस जेमतेम मोबदला शासनाकडून दिला गेला. परंतु अद्यापही सदर प्रकल्प पूर्णत्वास आला नाही. सदर प्रकल्पास गावकऱ्यांचा विरोध नसून या प्रकल्पामुळे पावसाळयात वरोरा तालुक्यातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान होत आहे. यासाठी शासनाने प्रकल्पबाधीत ९ गावांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार धानोरकर यांनी बैठकीत केली. तसेच शेती गेल्याने शेतकऱ्यांच्या पाल्याला सदर प्रकल्पात नोकरीमध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या प्रकल्पाकरीता २४० कोटी रुपयांची संभाव्य मागणी असून याद्वारे बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तरी सदर सानुग्रह निधी मंजूर करुन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घ्यावी, अशी विनंती आमदार धानोरकर यांनी सरकारकडे केली. यासंदर्भात शासन लवकरच योग्य भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन अतिरिक्त मुख्य सचिव यांनी उपस्थिताना दिले. या बैठकीकरीता मा. आ.समीर कुणावार, मा.आ. बोदकुलवार, मा.आ.उइके यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य सचिव श्री. कपूर, श्री. परदेसी, श्रीमती वरखडे मॅडम, श्री. पवार साहेब यांची उपस्थिती होती. तसेच बैठकीकरीता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी उपस्थित होते.

CLICK TO SHARE