उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी उपविभागीय बांधकाम अभियंता यांना निवेदन देण्यात आले

सोशल

प्रतिनिधि:पवन ढोके(वरोरा)

वरोरा:ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, संपूर्ण तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून प्रशासन साखर झोपेत आहे. वेळोवेळी निवेदन देऊन देखील रस्त्यांची डागडुजी करण्याची तसदी घेतली जात नाही. आंदोलन करुन देखील या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग येत नाही. गेल्या वर्षी पासुन या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी निवेदन, आंदोलन सुरू आहे तरी सुद्धा प्रशासनाने पाऊल उचलले नाही. उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी उपविभागीय बांधकाम अभियंता यांना निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे, तालुका प्रमुख दत्ता बोरेकर असा, युवासेना जिल्हा प्रमुख रोहण कुटेमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले . या रस्त्याच्या मागणी साठी अनेक निवेदन दिले आहे पण त्याला गांभीर्याने घेतले गेले नाही त्यामुळे आक्रमक आंदोलन केल्यास याला जबाबदार प्रशासन असेल. गेल्या 3 वर्षापासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्याच्या खड्ड्यांनी प्रवास करताना अनेक अपघात होत आहे लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. रस्त्याने सगळी कडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे, वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी वैभव पुसदेकर, रोशन भोयर, विजय कुडे उपस्थित होतें..

CLICK TO SHARE