वंचित च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी मुकुंद करवंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत:वसमत येथील वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद करवंदे यांचा जाहीर सत्कार वसमत येथे बुद्ध विहारात करण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते,वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष पदी मुकुंद करवंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित चे जिल्हाध्यक्ष शेखर अफजल यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रभावतीताई खंदारे, नरेश कोकरे, काशिनाथ साळवे,‌ राहुल गायकवाड, कोंडीबा मोरे, राहुल भुतनर, काशिनाथ भोसले,‌चांदू नादरे, कांताबाई दवने, अरुणा कांबळे, गंगा मारकुळे आदींची उपस्थिती होती. यावेळी निवडीबद्दल मुकुंद करवंदे यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना प्रभावतीताई खंदारे यांनी अनुवादाच्या विरोधातील आंबेडकरवादी चळवळीला व संविधानाला वाचविण्यासाठी ओट भी देंगे, नोट भी देंगे अभियान जिल्हाभरात राबविण्याचे आव्हान केले

CLICK TO SHARE