विवाहाची पत्रिका छापण्याकरता गेला आणि परतलाच नाही,रात्रीच्या सुमारास उभ्या ट्रॉलीला धडक दिल्याने जागीच मृत्यू

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर येथील रहिवाशी मनोज विठ्ठलराव भोयर वय २९ वर्ष याचे दुचाकीने उभ्या ट्रॉलीला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला सदर दुर्दैवी घटना घटना दिनांक १ मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास आजनसरा फाट्याजवळ घडली. मनोज चे पंधरा दिवसापूर्वी साक्षगंध उरकले होते. विवाहाच्या पत्रिका छापण्याकरता तो सकाळी ९ वाजताच्या सुमारास गांगापूर येथून अल्लीपूर या गावी गेला. रात्री ८ वाजताच्या सुमारास मोटर सायकलने गांगापूर येथे परत येण्यास निघाला असता त्याचे मोटरसायकल क्रमांक एम एच ३२ एटी १७९८ ने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या कूटार भरलेल्या बंद उभ्या ट्रॉलीला धडक दिली व त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारा अंधार असल्याने तसेच ट्रॉलीवर कुठल्याही प्रकारची इंडिकेटर नसल्याने मोटरसायकल चालक मनोजला रस्त्याच्या मधोमध उभी असलेली ट्रॉली दिसली नाही. ट्रॉली चालकाच्या हलगर्जीपणामुळे मात्र मनोज ला आपला जीव गमवावा लागला. आजसरा फाट्याजवळ महाजन यांच्या बंड्याजवळ सदर अपघात घडला.कुटार भरलेल्या ट्रॉलीचे चाक पंचर झाल्याने ट्रॅक्टर चालक देवानंद लक्ष्मण मेश्राम , राहणार येरनगाव याने रस्त्याच्या मध्येच ट्रॉली उभी करून गाडीचे चाक पंच दुरुस्ती करता नेले होते. परंतु रस्त्याच्या मधोमध असलेल्या ट्रॉली मुळे अपघात होऊ नये. याची कुठलीही काळजी घेतली घेतली नाही. त्यामुळे मनोजला संसाराच्या गाठी बांधण्यापूर्वीच नाहक आपला जीव गमवावा लागला. फिर्यादी अविनाश राऊत यांचे तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक देवानंद मेश्राम याच्यावर गुन्हा दाखल केला असून वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मिश्रा यांचे मार्गदर्शनात बीड जमादार उमेश ठोंबरे निखिल बोबडे हे पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे. मनोज भोयर आकस्मित मृत्यूने गांगापूरवासीयांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

CLICK TO SHARE