महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा विरोधात आप तर्फे बिल दहन आंदोलन

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर शहरातील गेल्या अनेक महिन्यांपासून नळाच्या अवाढव्य बिलांमुळे त्रस्त आहे. त्यामुळेच आम आदमी पक्षातर्फे 4 मार्च 2024 रोजी शहरातील नगरपरिषद चौक सरकारी दवाखान्याच्या समोर बिल दहन आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यां पुढील प्रमाणे आहेत :-1) शहरातील जनतेला अवाढव्य पाणी बिल न देता सर्वांना सरासरी बिल देण्यात यावे.2) शहरातील पाईपलाईनच्या समस्यां सोडविण्यात यावे.3) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांची सामान्य नागरिकांसोबतची वागणूक सुधारावी.4)नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्याकरिता योजना तयार करावी.5) पाण्याचे जुने बिल माफ करून नवीन कनेक्शन देण्यात यावे.6) मेन्टेनन्स च्या काळात नागरिकांसाठी पाण्याची सोय करून ठेवावीअश्या मागण्यांना धरून आप तर्फे हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाबाबत नागरिकांमध्ये माहिती पोहोचविण्याकरिता ठिकठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पाॅम्प्लेटिंग केली जात आहे आणि जागरूकता पसरवली जात आहे. शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी सर्व नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

CLICK TO SHARE