अल्लीपूर ते भोजनखेडा हा आठ किमी रस्त्याची लागली वाट

अन्य

येणाऱ्या पावसाळ्यात शेती करावी तरी कशी ? अनेक शेतकऱ्यांनी उपस्थीत केला सवाल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

अल्लीपूर ते भोजनखेडा हा आठ किमी.चा रस्ता शेतक-यांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. कारण त्या रस्त्याने धड वाहने सोडा पण बैलबंडी सुध्दा चालु शकत नाही. कारण रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते, अशी अवस्था झालेली आहे. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणचे पुल सुध्दा खचु लागले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी पावसाळ्यातील हंगामात शेती करावी तरी कशी, हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे.

मतदार संघातील लोकप्रतिनिधी मात्र आता केवळ भूमिपूजन व लोकार्पण या कामात गुंतून आहेत. त्यांना शेतक-यांशी काही देणेघेणे नाही. लवकरच निवडणुकीची आचार संहिता लागणार आहे. निवडणुकीमध्ये मात्र हे लोकप्रतिनिधी शेतक-यांना मताचा जोगवा मागण्यासाठी नक्कीच येणार. परंतु, त्यांना लोकांच्या रास्त मागण्यां

विषयी काही देणेघेणे नाही. अल्लीपूर ते भोजनखेडा या आठ किमी रस्त्यावर अनेक शेतक-यांच्या शेती आहे. तसेच तळेगाव टा. ते भोजनखेडा हा सुध्दा त्या रस्त्याला जोडणारा पांदण रस्ता आहे. त्या सुध्दा रस्त्याची अशीच बिकट अवस्था आहे. येणा-या पावसाळ्याच्या हंगामातील शेतकरी आपल्या शेतात काम करू शकणार नाही. एवढी दयनीय परिस्थिती या रस्त्याची आहे. लोकप्रतिनिधी मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत

असल्याचा आरोप अनेक शेतक-यांनी केलेला आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापुर्वीच या रस्त्याची तातडीने दुरूस्तीची निविदा काढावी व कामाला सुरूवात करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा या मार्गावरील शेतक-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. तसेच येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय शेतक-यांनी घेतलेला आहे.

CLICK TO SHARE