उबाठा गटाच्या गडचिरोली जिल्हा विस्तारकपदी शुभम सोरटे यांची नियुक्ती

अन्य

प्रतिनिधी:विलास लभाने समुद्रपूर गिरड

शिवसेना उबाठा गटाच्या राज्य विस्तारकांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून गिरड येथील शिवसैनिक युवा व्याख्याते शुभम सोरते यांची गडचिरोली जिल्हा विस्तारकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर नियुक्त्या करण्यात आल्या.मुख्यता शेतकऱ्यांच्या पोराला युवा सेनेत महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.शुभम सोरटे सामान्य शेतकरी कुटुंबातील युवक असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रभाविपणे व्याख्यानातून मांडून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असल्याची दखल घेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवा सेना सचिव श्री.सरदेसाई,युवा सेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे यांनी ही निवड केली.शुभम सोरते यांची गडचिरोली जिल्हा विस्तारकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद भट्टे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पारखी, तालुका संघटक रवी ठोंबरे, युवा सेना तालुकाप्रमुख युवा सेना मार्गदर्शक नितीन सरोदे, अभीलाश गिरडकर,तालुका संघटक पंकज लाटकर, राकेश चंदनखेडे, सुमित भिसेकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले

CLICK TO SHARE