घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी केले जेरबंद,थेट कारागृहात रवानगी

क्राइम

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव (गोदिया)

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक २५/०२/ २०२४ रोजी फिर्यादी महिला नामे सौ. मनिषा सुरेशकुमार नारवानी, रा. चौव्हाण चौक, श्रीनगर, गोंदिया यांचे राहते घराचे दाराचा कुलुप तोडुन बेडरुम मधील लोखंडी आलमारीतील ०१ सोन्याची अगुंठी कि. २००००/-रु., १० नग पुजेचे चांदीचे सिक्के कि. १०००/-रु., नगदी १०,०००/-रु. असा एकुण ३१०००/- रु. चा मुद्देमाल अज्ञात चोरानी चोरी केल्याचे तक्रारीवरुन पो. स्टे. गोंदिया शहर येथे अप क्र. ४२/२०२४ कलम ४५४,४५७,३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्ह्याचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचनाप्रमाणे पो. नि.श्री चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून गुप्त माहितीच्या आधारे -चोरी करणारे आरोपी नामे- 1) मनीष मुनीराज भालाधरे, वय २६ वर्षे, रा. चौव्हान चौक, श्रीनगर गोंदिया 2) जय ऊर्फ दद्द प्रविण भालाधरे, वय २३ वर्षे, रा. सिंगलटोली, गोंदिया यांना दि. २८/०२/ २०२४ रोजी अटक केली. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी तपास करुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले एक सोन्याची अगुंठी कि. २०,०००/-रु. आणि चांदीचे सिक्के कि. १०००/-रु. असा एकुण २१,०००/- रु. चा माल दि. २९/०२/२०२४ रोजी हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे सदर गुन्हयातील अन्य एक आरोपी नामे- 3) प्रथम ऊर्फ दद्द महेश भोयर रा. कचरा मोहल्ला गोंदिया यास यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील येथील पथकाने ताब्यात घेतलेले होते नमुद गुन्हयाचा तपास पोहवा दिपक रहांगडाले हे करीत आहेत. तिन्ही आरोपीतांना आज दि.०१/०३/२०२४ रोजी मा. न्यायालयात पेश केले असता मा. न्यायालयाने त्यांची दि. १५/०३/२०२४ रोजी पर्यंत भंडारा कारागृहात रवानगी केलेली आहे.सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री चंद्रकांत सुर्यवंशी यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोहवा जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, सतिश शेंडे, दिपक राहांगडाले, प्रमोद चव्हाण, पोशि/सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते, करण बारेवार, अशोक रहांगडाले यांनी केली आहे.

CLICK TO SHARE