सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव व भा.रा.ब. 2 बिरसी तर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहीत्याचे वाटप

अन्य

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव (गोदिया)

कम्युनिटी पोलीसींग दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाँव चे स्तुत्य उपक्रम पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखील पिंगळे, यांचे संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा. श्री. विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव अंतर्गत कम्युनिटी पोलीसींग, दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून उपक्रम राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २९/०२/ २०२४ रोजी दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रम शाळा गोठणगांव येथील इयत्ता ५ वी ते १० वी च्या एकुण ७३विद्यार्थ्यां करीता स.दु.गोठणगांव व जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमानाने घरगुती वापराकरीता कपडयांचे वाटप करण्यात आले आगामी वार्षिक परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणुन दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रम शाळा गोठणगांव येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना एकुण ३५ पेपर पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच जि.प. प्राथमिक शाळा गोठणगांव येथील इयत्ता 1 ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना एकुण 74 पेपर पॅडचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.दु. गोठणगांवचे प्रभारी अधिकारी श्री.सचिन घाटे, पोउपनि शुभम नवले, तसेच IRB चे पोउपनि सुनिल चव्हाण, स.फौ. राजकुमार घोरमारे , पोशि प्रकाश गभने , पो. शि. रत्नशिल मेश्राम तसेच दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. मेश्राम सर, जि.प.शाळा गोठणगाव चे कापगते यांनी परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE