गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल आमगाव येथील उन्हाळ्यात माठाला विशेष मागणी

अन्य

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव

आमगावं थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माठाचे आमगावं येथील बाजारात आगमन झाले आहे. यात गरिबांचा फ्रीज म्हणून मातीचे माठ सर्वांनाच परिचित आहे. उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी शरीराला थंडावा देते. याशिवाय आरोग्यासाठीही लाभदायक असल्याने अगदी सर्वच स्तरातील नागरिक मातीचे माठ खरेदी करणे पसंत करतात. व उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागल्याने माठाची मागणी वाढली आहे. मात्र बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या माठाची जागा आरो वॉटर मशीन, मिनरल वॉटर,पाण्याचे पाऊच, पाण्याचे जार, थंड व्यावसायिकांवर काही प्रमाणात परिणाम पाण्याच्या बाटल्या, इलेक्ट्रॉनिक फ्रीजने झाला आहे. परंतु आजही थंड पाण्यासाठीघेतली आहे. त्यामुळे कुंभार सगळीकडे माठच वापरला जातो. तरशहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचा वापर अधिक वापर केला जात आहे. हळूहळू सगळ कितीही जग पुढे गेले तरी काही काही गोष्टी या ‘जुनं ते सोनं’ असं म्हणून आपण वापरतच असतो त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘माठ’. आपल्या पूर्वजांनी मातीचं महत्त्व जाणलं होतं म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली होती. अजूनही अनेक कुटुंबात माठाचा वापर केला जातो. *चिनी मातीच्या माठाला अधिक मागणी* सध्या बाजारात मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी वाढली आहे. सध्या 70 ते 150 ते रुपयांपर्यंत असलेल्या माठांची विक्री होत असून नळ असलेल्या माठांची किमत थोडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर पांढरे, लाल व चिनी मातीपासून तयार केलेल्या माठाला अधिक पसंती मिळत आहे.*मातीच्या भांड्यांचा वापर वाढला* आरो वॉटर मशीन, मिनरल वॉटर, पाण्याचे पाऊच, पाण्याचे जार, थंड पाण्याच्या बाटल्या, ‘इलेक्ट्रॉनिक फ्रीज’ या नवीनतंत्रालाही मातीचे भांडेना टक्कर देत आहेत. पाण्याची बाटली, माठ, पातेले, तवा, गाडगे, ताट, वाटी अशी मातीपासून बनवलेली भांडी बाजारात आहेत. मातीच्या भांड्यांचा वापराने आरोग्यास अनेक फायदे मिळतात.

CLICK TO SHARE