अल्लीपुर येथील अपघाती मृत्यू झालेला परिवारास तसेच जखमींना न्याय मिळणार का?

क्राइम

अल्लीपूर येथे अवैध रेती माफिया यांच्या भरधाव टिप्परने झाला होता अपघात पोलिसांच्या कारवाईवर गावकऱ्यांचा संकोच

प्रतिनिधि अरबाज पठाण ( वर्धा )

( पुलगांव ) न्याय मिळण्याकरिता भीम आर्मी विदर्भ प्रमुख कार्यालय अंकुश कोचे यांना अलीपुर ग्रामस्थांनी व अपघाती झालेल्या परिवारांनी दिले निवेदनअल्लीपूर येथे अवैध रेती माफिया यांच्या भरधाव टिप्परने दि. 11/2/24/ऑटो ला मागून जोरात धडक दिली होती ज्या मधे चार ते पाच गंभीर जखमी तर एकाचा पंधरा दिवसा दरम्यान मृत्यू झाला आहे. पण तरीसुद्धा कारवाई शून्य अलीपुर गाव मध्ये अपघातामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.अपघातामुळे मृत्यू झालेल्या मेघरे परिवारावर संकटाची काळ तर ऑटो चालक यावर दैनंदिन जीवनामध्ये घर कसे चालवावे उपासमारीची वेळ तर बाकी गंभीर दुखापतीमुळे उपचार घेण्याकरिता आर्थिक बाजूने सक्षम नसल्याने जिवंत राहावे की मरावे या परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात रोज वाढू माफिया द्वारा रेती तस्करी व पोलीस प्रशासना द्वारा कारवाई होतात वृत्तवाणीमध्ये प्रकाशित होऊन दिसतात पण यावर आळा न लागल्यामुळे अलीपुर येथील ऑटो मध्ये सवार असलेल्या नागरिकांचा झाला अपघात याला जिम्मेदार कोण ?परवानगी नसलेल्या घाटावर आशीर्वाद कोणाचा नागरिकांचा प्रश्न ?पुष्पा मेगरे,सेजल मेघरे,अर्पिता आंबटकर,ममता गिरडे, लहान मुलगा संग्राम गिरडे, विलास हजारे असे अपघाती नागरिकांचे नाव आहे सदर घटना तेलरांधे यांच्या शेताजवळ ऑटो चालत असताना मागून एका रेती भरलेल्या भरधाव टिप्परने ठोस मारून उडवले आणि टिप्पर तिथेच न थांबता निघून गेला यामध्ये ऑटोतील लोकांना गंभीर दुखापत झाले यांना उपचारासाठी रुग्णालय येथे भरती करण्यात आले यामध्ये एका इसमाचा पंधरा दिवसात मृत्यू झाला परंतु पोलीस प्रशासना द्वारा परिवाराच्या माहितीवरून टिप्पर आजपर्यंत जप्ती नाही टिप्पर चा शोध सुद्धा लागला नाही कोण घटनेचे आरोपी आहे यावर सध्यातरी पोलीस प्रशासन द्वारा खुलासा करण्यात आलेला नाही. व परिवाराला माहिती सुद्धा देण्यात आले नाही सदर तक्रार अज्ञात वाहनविरुद्ध लिहिण्यात आले यामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे की साक्षीदार असून टिप्परची ओळख करणारे नागरिक तसेच टिप्पर क्रमांक सुद्धा गावकऱ्यांकडे आहे परंतु यावर पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष कसे काय केले असावे ? नागरिकांनी निवेदन मध्ये नमूद करून दिले ज्या परिसरात रेतीघाट चालत आहे त्या परिसरातील वाळू माफिया कुटुंबाच्या घरी जाऊन दमदाटी दाखवण्याचा प्रयत्न केले पंधरा ते वीस हजार रुपये घेऊन चुपचाप बसा असे सुद्धा गोपाल चंपतराव मेघरे यांच्या परिवारास बोलले या अन्यायावर न्याय मिळण्याकरिता आज दिनांक 4/ 3/ 24 भीम आर्मी कार्यालय येथे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांना निवेदन देण्यात आले व संविधानिक मार्गाने लढून मेघरे ऑटो चालक व गावातील नागरिकांना न्याय मिळून द्या अशी अर्जाद्वारे विनंती करण्यात आली त्यावेळेस उपस्थित विकास शंकरराव हजारे गणेश वामन गुल गाणे इत्यादी लोक उपस्थित होते भीम आर्मी विदर्भ प्रमुख कार्यालयाकडून लवकरच पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक कार्यालय नागपूर पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई सदर प्रकरणाचे पाठपुरावा करून मेल व निवेदन देऊन सदर घटनेची योग्य ते चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असे परिवारांना बोलताना सांगितले.

CLICK TO SHARE