तृतीयपंथी वकील शिवानी सुरकार यांची वर्धा येथे लोक अदालत पॅनलमध्ये निवड

अन्य

अब्दुल कदीर बख्श

भारताच्या इतिहासामध्ये नवीन उदाहरण प्रस्थापित दिनांक 3 मार्च 2024 रोजी वर्धा येथे जिल्हा व सत्र लोक अदालत न्यायालयात अधिवक्ता शिवानी सुरकार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. या दिवशी पार पडलेल्या लोक अदालत पॅनलवर मुख्य सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलेले वरिष्ठ स्तर न्यायाधीश व्ही. बि. घाडगे सर व अधिवक्ता शिवानी सुरकार यांनी एकूण 58 दिवानी केसेस मध्ये न्यायदान केले. 2018 मध्ये नागपूर येथिल विद्या कांबळे यांची लोक अदालत पॅनल वर सदस्य म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवड करण्यात आली होती त्यानंतर स्वाती बारूह यांची गुवाहाटी मधून लोक अदालत पॅनल वर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारत देशामध्ये एकूण चार तृतीयपंथी वकील आहेत त्यातून शिवानी सुरकार यांची पहिल्यांदाच लोक अदालत पॅनलमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये शिवानी सुरकार यांनी एक नवीन उदाहरण प्रस्थापित केलेले आहे. सन 2022 मध्ये शिवानी सुरकार या भारतातील तिसऱ्या व विदर्भातील प्रथम तृतीयापंथी वकील ठरल्या, त्यानंतर त्यांना वकील क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात सुद्धा अनेक पारितोषिके प्रदान करण्यात आली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा तसेच वर्धा विधीसेवा प्राधिकरण केंद्राचे अध्यक्ष संजय भारुका तसेच सचिव (न्यायाधीश) विवेक देशमुख यांचे शिवानीने मनापासून आभार मानलेले आहेत. तसेच त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे स्वर्गवासी वडील संतोषराव सुरकार , आई तुळसाबाई सुरकार व मार्गदर्शक बबनराव धाये, ऍड. असद खान, ऍड. रुबिया बैग आणि ऍड. जाहिद अली यांना दिले आहे.

CLICK TO SHARE