आम आदमी पक्षा तर्फे शहरात नळ बील दहन आंदोलन

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर सोमवार दिनांक- 04/03/2024 – शहरातील जनता पाण्याच्या अवाढव्य बील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी काराभारामुळे खुपच त्रस्त आहे. असे असताना आम आदमी पक्षातर्फे आज शहरातील सरकारी दवाखान्यासमोर नगरपरिषद चौकात आम आदमी पक्षातर्फे धरना आंदोलन करण्यात आले. व या आंदोलनात मोठ्या संख्येने शहरातील समस्याग्रस्त नागरिक तसेच पक्षाचे जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन जनतेने आक्रोश व्यक्त केला व अवाढव्य नळ बिलाचे दहन करण्यात आले. यासह शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी पाणी बिलांच्या संदर्भातील समस्या लवकर निकाली लावा. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कार्यपद्धती सुधारा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे बंद करा,त्याऐवजी शिक्षित युवकांना रोजगार द्या असे आवाहन केले. जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांच्या अध्यक्षतेत एक मागणीपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले.ज्याचा उत्तर तीन दिवसात मिळाले नाही तर पक्षातर्फे साखळी उपोषण केले जाईल अशी चेतावणी पक्षातर्फे देण्यात आली.

CLICK TO SHARE