शॉर्ट सर्किट मुळे दोन मोबाईल दुकाने जळून खाक-लाखोंचं झालं नुकसान

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले (हिंगोली)

वसमत:शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलनातील दोन मोबाईल दुकाने जळून सव्वातीन लाख रुपयाचा नुकसान झाल्याचा माहिती अर्ज दुकान मालकांनी शहर पोलिसात दिली आहे.दुकानदारांनी शहर पोलिसात दिलेल्या अर्जात नमुद करण्यात आले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे रॉयल मोबाईल रिपेरिंग सर्वीस व ताज मोबाईल शॉपी अशी दोघांची दुकाने एकमेकास लागून आहेत. सदरील दुकानास दि.04 मार्च 2024 रोजी रात्री अचानक शॉटसकीट झाल्यामुळे त्या मध्ये दोन्ही दुकानाला आग लागून त्यामध्ये मोबाईल व स्पेअर पार्टस आणि इतर दुरुस्तीचे साहित्य असे सर्व सामान सदर आगीत जळून खाक झाले दरम्यान अग्निशमन दलास पाचरण करण्यात आल्याने दलाने आगीवर नियंत्रण मिळवले सदर आगीमुळे रॉयल मोबाईल दुकानाचे अंदाजे रु. 2,75,000/- व ताज मोबाईल दुकानाचे रु. 50,000/- व असे एकूण 3,25,000/- असे दुकानाचे नुकसान झाल्यामुळे आम्हाला इतर कोणतेही कमविण्याचे साधन नसल्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने शासनाकडून मदत देण्याची विनंती शेख महोमद समी व अब्दुल वसीम रहीम (दिव्यांग) यांनी अर्जात केली आहे

CLICK TO SHARE